मर्दानी 💪
मर्दानी 💪
✍️ सखी थरवळ
काल राणी मुखर्जी चा सिनेमा मर्दानी आणि मर्दानी २ पाहिला. शब्दात व्यक्त करू नाही शकत एवढे दुःख झाले की हा एवढा दर्जेदार सिनेमा मी थिएटर मध्ये जाऊन का नाही पाहिला 😔😖 त्याहून जास्त दुःख हे समजल्यावर झाले की मर्दानी २ पण येऊन गेला आणि तो ही मी थिएटर ला जाऊन नाही पाहिला. खरं म्हणजे मर्दानी २ केव्हा आला हेच मला माहित नाही त्यामुळे मी तो पहिला नाही 😔
असो, मर्दानी पाहिला आणि राणीच्या प्रेमात पडले 😍 २२ ऑगस्ट २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ह्या सिनेमा मध्ये आहे शिवानी शिवाजी रॉय जी मुंबई मधील क्राईम ब्रांच ची सिनियर इन्स्पेक्टर आहे. दिसायला अत्यंत देखणी ही शिवानी जेवढी प्रेमळ तेव्हढीच राकट, मर्दानी आहे. राणीला ह्या पूर्वी आपण साडी, ड्रेस, शॉर्ट ड्रेस अशा वेगवेगळ्या पोशाखात पाहिलं आहे पण इथे पूर्ण सिनेमा मध्ये तिने शर्ट आणि जीन्स घातली आहे पण तरीही ती अतिशय सुंदर दिसली आहे आणि खरं सांगते एवढी सुंदर राणी मला या आधी कधीच वाटली नव्हती. सुंदर दिसून ही एक कडकपणा, एक attitude तिने चेहऱ्यावर खूप छान आणला आहे जो तिला अतिशय शोभून दिसतो.
ह्या सिनेमा ची कथा आहे एका सेक्स रॅकेट कम ड्रग्स डीलर ची जे मुलींना पळवून त्यांना वेश्याव्यवसाय करायला लावतात शिवाय त्यांच्या मार्फत इतर देशांमध्ये ड्रग्स सप्लाय करतात. ह्यांचा म्होरक्या आहे करण ज्याने स्वतःला वॉल्ट अस नाव दिलं आहे. करण हे पात्र साकारले आहे ताहिर भासिन ह्या अभिनेत्याने करण जरी ह्या सिनेमाचा खलनायक असला तरी तुम्ही शिवानी इतकंच त्याच्या ही प्रेमात पडाल 😍 करण दिसायला एकदम हँडसम, डोकं म्हणजे सुपर कमाल, शांत पणे बोलणं आणि आपल म्हणणं पटवून देणं, कुठलीही आरडा ओरड नाही, मारामारी नाही शांतपणे आपल काम करतो तो. एका सीन मध्ये पळवून आणलेल्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी पाठवण्यात येत असते तेव्हा त्यातील एक मुलगी आत्महत्या करण्याची धमकी देते तेव्हा करण तिला मारझोड किंवा तिच्यावर न ओरडता
शांतपणे, आणि समजेल अशा पद्धतीने हे पटवून देतो की तुझं मरण किती घातक आहे त्यापेक्षा तु मी सांगतोय ते कर तिथेच तो आवडतो, त्यांचा शांतपणा, समजावण्याचा पद्दत खूप आवडते आणि ती सफल ही होते ती मुलगी त्याच ऐकत तो सांगेल ते करण्यास तयार होते. अर्थात राग येतोच त्याचा पण तरीही आवडतो तो. शिवानी सोबत बोलतानाही तो अगदी नम्रपणे आणि आदराने च बोलतो, mam शिवाय हाक मारत नाही तिला, शिवाय तिला अहोजाहो ही करतो. फक्त एकदाच जेव्हा तिच्यामुळे त्याचा सगळ्यात जवळचा माणूस मरतो तेव्हाच तो तिच्याशी एकेरी वर येतो. पण बोलताना कुठलीही शिवी नाही, उगाच उकसवण नाही एकदम नम्रपणे, खरतर एकीकडे मुलींना विकून माणुसकीला काळीमा फासणारे घाणेरडे धंदे करायचे आणि दुसरीकडे शिवानिशी बोलताना आदर देऊन बोलायचं हा विरोधाभास च म्हणावा लागेल. असो एकूणच करण खलनायक असूनही मनात भरतो हे नक्की.
शिवानी आणि करण अगदी शेवटच्या अर्धा तासात समोरा समोर येतात तोवर ते एकमेकांशी फोनवर बोलतात दोघांचं ही बोलणं अगदी शांत, कुठेच एकमेकांना ओरडून किंवा धमक्या देऊन ते दोघे बोलत नाहीत दोघे ही आपापली खेळी खेळत समोरच्याला चॅलेंज करत मात देत असतात त्यामुळे दोघांनाही खूप संताप येतो पण तो संताप संभाषणात कुठेच आलेला नाही. त्यांचं बोलणं प्रेक्षकांचं मनोरंजन करतं हे नक्की.
ह्या सिनेमात पात्रांच्या तोंडी काही प्रमाणात शिव्या देखील आहेत, अगदी राणीच्या तोंडी ही पण त्या त्यांना शोभतात आणि त्या असायलाच हव्या अस वाटतं.
सिनेमाच्या शेवटी अर्थातच राणी अगदी मर्दानी बनून करण ला पकडते, त्यांचं रॅकेट जगासमोर आणते आणि जिंकते. सिनेमा पाहताना आपण पुढे काय होईल ह्याचा अंदाज लावू शकतो पण तरीही पहावसा वाटतो.
शिवानी च डोकं भन्नाट दाखवलं आहे, शिवाय ह्यात राणीचे फाईट सीन्स सुद्धा आहेत जे पाहताना टाळी आणि शिट्टी वाजली नाही तर नवलच. ह्या सिनेमाचे संवाद देखील खूप छान आहेत जसं मी म्हणाले की ह्यात काही शिव्या देखील आहेत पण त्या ऐकताना कुठेही अश्लील वाटत नाही.
करण आणि शिवानी दोघेही अगदी जसाश तसे आहेत दोघेही एकमेकांवर वार करतात पण आपल्यावर वार झाल्यावर दोघेही अगदी शांतपणे ती परिस्थिती हाताळताना दाखवले आहेत, कुठलाही उद्रेक त्यांनी केलेला नाही शांतपणे आता काय करायचं ह्याचा विचार करताना ते दिसतात.
ओव्हर ऑल मर्दानी हा सिनेमा स्टार्ट टु एंड आपल्याला खिळवून ठेवतो. अगदी पैसा वसूल असा हा सिनेमा आहे पण आपल badluck की अाता आपल्याला हा सिनेमा मोबाईल च्या छोट्या स्क्रीन वरच पहावा लागणार आहे 😔😒

खरच खूप छान फिल्म
ReplyDeleteChhan vishleshan 👍
ReplyDeleteNice observation ...
ReplyDelete