अटेंशन सिकर (भाग २)
अटेंशन सिकर (भाग २)
✍🏻सखी थरवळ
मागील भागात आपण पाहिलं की अनघा नावाची मुलगी जी अटेंशन सिकर आहे आणि इतरांच लक्ष वेधून घेण्यासाठी तिने बरेच उद्योग केले आणि स्वतः ची फजिती करून घेतली. आता पुढे...
कॉलेजच्या परीक्षा झाल्या, अनघा बाईसाहेब पास झाल बास झालं एवढे मार्कस मिळवून कॉलेज बाहेर पडल्या. काही दिवसांनी छोट्याशा कंपनीत नोकरी मिळाली आणि नवीन आयुष्याला सुरुवात झाली.
कंपनी मध्येही अनघाच्या अटेंशन सिकींग स्वभावामुळे थोड्याच दिवसात सगळ्यांना समजलं की अनघा काय मुलगी आहे ते त्यामुळे इथे ही सगळ्यांनी तिला इग्नोर करायला सुरुवात केली. 🙁
असेच दिवस जात होते. दोन्ही बहिणींची लग्न झाली आणि अनघाच्या लग्नाचं घरात बोललं जाऊ लागलं. पण अनघाचा स्वभाव आणि मूर्खपणा सर्व नातेवाईक आणि आजूबाजूचे जाणून होते त्यामुळे तिच्या स्थळाची कुणी जबाबदारी घेतच नव्हतं. एखाद्याचा स्वभाव सुरुवातीला जरी आवडला नाही तरी आपण त्या व्यक्तीला अडजस्ट करतो पण अनघाचा स्वभाव आणि वागणं असं होत की समोरच्याला तिचा वैताग यायचा, मग अशा मुली सोबत संपूर्ण आयुष्य कोण घालवेल? कितीही कौतुक केलं तरी तिचं समाधान व्हायचच नाही 🙄 आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं काय आणि किती कौतुक करणार? 🤷🏻♀️
बरीच स्थळ पाहून झाली पण कुठेच काहीच जुळत नव्हतं. अरेंज मॅरेज म्हंटल्यावर पाहुणे मंडळी आजूबाजूला चौकशी करतातच ना तेव्हा काही विघ्नसंतषी लोक सांगायचे तिच्या मूर्खपणा बद्दल आणि मग नकार यायचा. 😔 बरं आपल्या मॅडम दिसायला ही काही अप्सरा नाही की तिचे सौंदर्य पाहून तिचा स्वभाव कुणी इग्नोर करेल. 😒 बरेच दिवस कुठेच काहीच जुळत नव्हतं. एक दिवस आई वडील, दोघी बहिणी आल्या आणि अनघाला स्वभाव बदलण्या बद्दल बोलू लागले. आधी प्रेमाने, मग दम देऊन आणि मग सुरू झाला इमोशनल अत्याचार... 😟😖 रडणं, शपथ देणं, वचन घेणं सगळे सोपस्कार पार पडले. शेवटी अनघा ने ही रात्र भर नीट विचार केला आणि स्वभावात बदल करावा असं ठरवलं. ठरवलं तर आहे पण ते कितपत यशस्वी होईल आणि किती दिवस चालणार ह्याची खात्री तिला स्वतःला देखील नव्हती. पण ती प्रयत्न करणार होती.
रविवार ची सकाळ. अनघा च्या मोठ्या जिजाजीने फोन केला त्यांचा एक जुना मित्र त्यांना भेटला म्हणे, त्याच्या शी अनघा बद्दल त्यांनी बोलणी केली आहे आणि आज तो तिला बघायला येणार आहे असा बॉम्ब त्यांनी टाकला. बघायला पाहुणे येणार म्हंटल्यावर अनघा ला आधी खूप गम्मत वाटली पण नंतर पोटात गोळा आला कारण या आधी हा असा बघण्याचा कार्यक्रम कधी झालाच नव्हता बघायला येण्या आधीच नकार आले होते 😔 त्यामुळे तिला थोडी भीती वाटत होती.
"राकेश" चांगली नोकरी, भरपूर पगार, स्वतःच वडिलोपर्जित घर जे वडिलांनी ह्याच्या च नावावर केलं आहे, आई वडील काही वर्षापूर्वी वारले, मोठा भाऊ आणि त्याचा संसार आहे पण त्याला ह्याच्या प्रॉपर्टी मध्ये रस नाही त्याने त्याच बरच कमावलं आहे आणि तो त्याचा खुश आहे, कधी तरी दोघं एकमेकांकडे येत जात असतात. राकेश तसा एकलकोंडा, अरसिक माणूस पण माणूस म्हणून खूप छान. त्याच्या काही अपेक्षा ही नव्हत्या मुलीने व्यवस्थित घर सांभाळावे, छान संसार करावा एवढंच. त्याला अनघा आवडली अनघाला ही राकेश आवडला. राकेश च्या भावाला काही घेण देण नव्हतं राकेशला पसंत आहे ना बास असं म्हणून त्याने ही ग्रीन सिग्नल दाखवला.
मग काय चांगला सा आणि जवळचा मुहूर्त पाहून, थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत अनघा आणि राकेश च शुभमंगल सावधान झालं.
सुरवातीच्या एक दोन दिवसातच अनघाला राकेश चा स्वभाव समजला आणि ती अगदी कोलमडून गेली. राकेश खूप चांगला होता पण एकदम अरसिक असल्याने तिच्या कुठल्याच गोष्टीत तो लक्ष घालत नव्हता ना लक्ष देत होता. थोडक्यात सांगायचे झाले तर दोघांचे स्वभाव अगदी दोन टोकं... आणि तिच्यासाठी वाईट गोष्ट ही होती की ह्या अशा माणसासोबत अख्खं आयुष्य घालवायचं आहे 🥺😟😩 ज्या गोष्टी साठी तिने आयुष्यात नको नको ते केलं, लोकांची बोलणी खाल्ली, स्वतःची फजिती करून घेतली जीचं आयुष्यच दुसऱ्याचं अटेशन मिळवण्यात गेलं आणि तेच तिला तिच्या हक्काच्या माणसा कडून मिळत नव्हतं आणि पुढे ही मिळेल अशी आशा नव्हती हा विचार करून ती पूर्ण तुटली.
राकेश मध्ये खोट काढण्या सारखं बाकी काहीच नव्हतं. त्याने अनघाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले होते. कुठे ही जा, कुठले ही कपडे घाल, काहीही कर त्याची कशाला ना नाही फक्त अट एकच की तिच्या काहीही करण्याचा त्याच्या रोजच्या जगण्यात अडथळा येऊ नये त्याच घर नीट सांभाळलं गेलं पाहिजे आणि जेवण वेळेवर मिळायला हवं बाकी काही अपेक्षा नाही. सगळं करण्याची मुभा अनघाला होती. तिच्या कुठल्याच मागणीला त्याची ना नव्हती. पण तिला असं नको होत. सांगून तर काय कुणीही करेल स्वतःहून करायला हवं असं तिला वाटे. 🙁
गजरा घेऊन या म्हंटल्यावर आठवणीने गजरा घेऊन येणार पण सांगितल्यावर, कशी दिसते विचारल्यावर नेहमी छान म्हणणार पण विचारल्यावर स्वतःहून नाही आणि नेहमी फक्त छान च या व्यतिरिक्त दुसरे कौतुकाचे बोल नाही. कधी स्वयंपाकाचं कौतुक नाही की दिसण्याच नाही. रोज सकाळी उठायचं, ऑफिस ला जायचं, घरी येऊन जेवायचं आणि झोपायच हा दिनक्रम कशा कशाची म्हणून आवड नाही. स्वतःहून फिरायला, नाटक सिनेमाला किंवा डिनर डेट ला घेऊन गेला नाही, हो पण अनघा ने जाऊया म्हंटल्यावर कधी नाही देखील म्हटलं नाही. सगळं काही सांगितल्यावर करणार आणि ह्याचाच अनघाला राग यायचा. जीव गुदमरत होता तिचा, कधी कधी ती खूप रडायची देखील पण काय आपणच रडा आणि आपणच डोळे पुसा काही अर्थ आहे का ह्याला?
तिच्या मनाची ही सल तिने आई वडलांना बोलून दाखवली पण बाकी सगळं उत्तम आहे आणि कसलीच काळजी नाही म्हंटल्यावर ह्या अशा कारणासाठी काय बोलणार असं म्हणून त्यांनी तिलाच पुन्हा एकदा स्वभाव बदल करण्यावरून भाषण दिलं.
नाराज होऊन अनघा घरी आली पण घरी आल्यावर तिला फार अस्वस्थ वाटू लागलं. प्रवासामुळे झालं असेल असं म्हणून तिने थोडा वेळ आराम केला पण काही वेळाने पुन्हा तसाच त्रास झाला. संध्याकाळी राकेश घरी आल्यावर अनघाला असं अवेळी झोपलेलं पाहून त्याने तिची वचारपुस केली आणि तिला डॉक्टर कडे घेऊन गेला. दवाखान्यात गेल्यावर दोघांना ही सुखद धक्का बसला. ते दोघे आई बाबा होणार होते 👨👩👧 ही गुड न्यूज ऐकुन दोघांनाही फार आनंद झाला. दोघांनी आपापल्या घरी आनंदवार्ता कळवली सगळीकडून दोघांचे अभिनंदन केले गेले. राकेश ही खुश होता पण अनघा मॅडम ला त्याने आता आहे त्या पेक्षा जास्त खुश होण अपेक्षित होत. म्हणजे सिनेमा मध्ये वैगेरे दाखवतात तस नवरा बायकोला उचलून घेतो, गोल गोल फिरवतो आणि मग बायको त्याला लाडिकपणे ओरडते अहो हळू आता असा धसमुसळेपणा बरा नाही किंवा पोटा जवळ जाऊन बाळाशी बोलणे हे असं काही राकेश ने करावं असं अनघाला वाटे 🤦🏻♀️
दिवस गेले तेव्हापासून अनघा चा अटेंशन सिकर स्वभाव पुन्हा डोकं वर काढू लागला. पुन्हा तिला सगळ्यांनी अटेंशन द्यावं असं वाटू लागलं, सगळ्यांना समजलं पाहिजे की ती गरोदर आहे, मग सगळ्यांनी कौतुक करावं, अभिनंदन कराव हे असं तिला वाटू लागलं आणि पुन्हा तिच्यातली झोपलेली अटेंशन सिकर अनघा जागी झाली.
डॉक्टर ने सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जायला सांगितलं त्यामुळे मॅडम रोज सकाळ संध्याकाळ वॉक ला जाऊ लागल्या. अजून पहिलाच महिना होता पोट जस च्या तस च होत पण चालताना उगाच कमरेवर हात ठेवून पोट पुढे काढून चालायचं, हलकी हलकी पावले टाकायची, दम लागला आहे अस दाखवायचं की जेणे करून आजूबाजूच्या लोकांना समजेल की ही बाई गरोदर आहे. सर्वांचं लक्ष वेधून घण्यासाठी ती पुन्हा काही न काही करामती करू लागली. 🤦🏻♀️ पण त्याचा तिला हवा तसा परिणाम होत नव्हता. 😒
अनघा जरी गरोदर असली तरी राकेश च्या स्वभावात काही फरक नव्हता तो पूर्वी सारखाच अरसिक च होता. तिच्या आई वडलांसाठी ही मुलीचं बाळंतपण काही नवीन नव्हतं ह्या आधीच्या दोन मुलींची बाळंतपण झाल्याने त्यांना अनघा च्या बाळंतपणाची एवढी उत्सुकता नव्हती. राकेश च्या भावाकडून काय अपेक्षा करणार एक अभिनंदन चा फोन आला होता दोघा नवरा बायको चा तेव्हा अनघा शी बोलताना काळजी घे वैगेरे असं जुजबी बोलले दोघे. सगळे आनंदी होते पण अनघा ला जसं हवं तस सुपर एकसायटेड कुणीच नव्हतं. 😔
अनघा ची फार चीड चीड व्हायची तिला राकेश चा फार राग यायचा. रोजची गोष्ट वेगळी असते पण हे दिवस रोज रोज येणार आहेत का? पहिल्यांदा गरोदर आहे मी, आपल पहिलं बाळ त्याच काहीच कौतुक कसं नाही? राकेश तीची पूर्ण काळजी घेत होता पण तिला हवं होत त्याच गोड गोड बोलणं, पोटावर हात ठेवून बाळाशी गप्पा मारणं, बाळ झाल्यावर काय काय करायचं ह्याची स्वप्न रंगवणं, सगळं फिल्मी स्टाईल हवं होत तिला. पाहता पाहता नऊ महिने झाले आता डॉक्टरांनी दिलेली तारीख ही जवळ आली होती अनघा ही आता थकली होती कधी एकदा बाळंतीण होते असं झालं होत तिला. पडल्या पडल्या विचार सुरू होते डोळ्यासमोरून नऊ महिन्यांचा प्रवास जात होता आणि त्यात राकेश कुठेच नव्हता फक्त एका रोबोट प्रमाणे तो अनघा म्हणेल ते सर्व करत होता खूप रडू आल तिला ते सगळं आठवून. 😩 भिंतीवर लावलेल्या बाळ कृष्णाचा फोटो पाहून त्यालाच जाब विचारू लागली... आयुष्यात काय मागितलं मी? पैसा, प्रॉपर्टी, सोन नाही ना? मला हवं होतं फक्त सगळ्यांचं अटेंशन... आहे त्या परिस्थितीत खुश होते आणि अजून ही आहे पण सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं, माझं कौतुक करावं एवढंच मागणं होत ना माझं तेवढं ही देऊ शकला नाहीस तू? आई वडील, भावंड, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, नवरा, सासरची मंडळी, आजूबाजूची माणसं ह्या पैकी एक ही व्यक्ती असा नाही दिलास ज्याला माझ्याकडे लक्ष देता येईल. कुणालाच माझं म्हणणं, माझं मन कधीच का कळलं नाही? मला जे हवं ते देणं इतकही अवघड किंवा अशक्य नाहीये ना मग का नाही कुणी असं जे मला पूर्ण अटेंशन देईल? का कुणी असं नाहीये ज्याचं माझ्याकडे लक्ष असेल? असं सगळं बोलत असतानाच अचानक तिच्या पोटात दुखु लागले. राकेश च ऑफिस जवळच असल्याने तो लगेच घरी आला आणि अनघाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. काही तासांनी नर्स ने येऊन राकेश चे अभिनंदन केले आणि मुलगी झाली असल्याचे सांगितले.
अनघा आणि बाळ अगदी सुखरूप घरी आले. बाळाचे नाव राधा ठेवले. बाळ कृष्णाने अनघाची प्रार्थना ऐकली होती. तिच्या साठी फक्त तिलाच अटेंशन देणारी, तिच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणारी आणि लक्ष देऊन तिच्या सारखंच करू पाहणारी अशी राधा तिच्या आयुष्यात पाठवली होती. 🤗 राधाला बाबा पेक्षा आई जास्त जवळची वाटे. लहान मुलांसाठी लहान असे पर्यंत त्यांची आईच त्यांचं जग असते पण राधा मोठी झाली तरीही तिच्या साठी तीची आई म्हणजे सुपर मॉम होती, जगातली सर्वांत सुंदर स्त्री होती, अनघा जे काही करते ते सगळं बेस्ट च असतं असच राधा ला वाटे त्यामुळे ती नेहमी तीच भरभरून कौतुक करी अगदी अनघा ला हवं तसच ☺️

छान अप्रतिम....
ReplyDelete������
ReplyDeleteChan shevat 👌👌
ReplyDelete