अटेंशन सिकर (भाग १)

अटेंशन सिकर (भाग १)
✍🏻 सखी थरवळ

आयुष्यात पहिल्यांदाच कथा लिहीत आहे... प्रयत्न केलाय आणि तो कितपत यशस्वी झालाय हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. 😊🙏🏻


"अनघा" एक मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य मुलगी. दोन मुली झाल्यावर ही तिसरी मुलगी झाली. 👧🏻 दिसायला ती काही खूप सुंदर वैगेरे नाही पण अगदी वाईट ही नाही. तिच्या सवयी किंवा आवड निवडही वेगळ्या अशा नव्हत्या. सर्व सामान्य मुलींच्या ज्या ज्या सवयी आणि आवड असतात त्याच हिच्या देखील. थोडक्यात काय तर तिच्यात स्पेशल असं काही नव्हतं. पण तरीही तिला सगळ्यांनी स्पेशल वागणूक द्यावी असं तिला नेहमी वाटे. 😇 तिचं नेहमी कुणीतरी कौतुक करावं, तीची कुणीतरी दखल घ्यावी असं तिला वाटायचं.
साधारणपणे कुठल्याही पहिल्या गोष्टीचं आपल्याला जास्त कौतुक असतं आणि ही घरातली तिसरी मुलगी त्यामुळे तिचं म्हणावं तेवढं कौतुक झालंच नाही. 🙍🏻‍♀️ पण म्हणजे अगदीच दुर्लक्ष केलं किंवा तिसरी मुलगीच म्हणून तिला हिन वागणूक दिली अस ही काही नाही पण आई वडलांना कामातून आणि बाकी गोष्टींमधून तिला हवं तेव्हढ लक्ष देता आल नाही एवढंच. प्रत्येक वेळी नवीनच सगळं मिळालं अस ही झालं नाही काही गोष्टी नवीन घेतल्या गेल्या तिच्या साठीही पण बऱ्याचशा वस्तू ह्या मोठ्या बहिणीच्या च वापराव्या लागल्या.
असच दिवसा मागे दिवस आणि वर्षा मागे वर्ष सरत गेले अनघा मोठी झाली, कॉलेज ला जाऊ लागली. लहानपणापासून जे आयुष्य होत ते तसचं राहील पण अनघा ने हार मानली नाही प्रत्येकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न काही तिने सोडला नाही. एव्हाना सगळयांना तिचा हा स्वभाव माहीत झालेला आणि त्यामुळे तिची लांडगा आला रे आला सारखी गत झाली होती. लहानपणी बऱ्याचदा इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने खोट्याचा आधार घेतला होता आणि फसली होती त्यामुळे सगळ्यांनाच माहीत होत की ही स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी खोट वागते 🙄 मग कधी खरंच जरी काही झालं तरी बीचारीकडे कुणी लक्ष देत नसे. 😔
अभ्यासात किंवा इतर कुठल्या गोष्टीत ही मॅडम काही हुशार वैगेरे नव्हत्या त्यामुळे कधी शिक्षकांचं ही तिच्या कडे फारस लक्ष गेलं नाही. कॉलेजला गेल्यावर तर काय अनघा बाईंना पंखच फुटले, रोज नवीन ड्रेस, नवीन नखरा करून बाईसाहेब अगदी समारंभाला जातात तशा तयार होऊन जात. अभ्यासापेक्षा स्वतःच्या फोटोजला मैत्रिणीला लाईक आणि कमेंट करायला सांगणे, स्वतःच फेक अकाउंट बनवून रियल अकाउंट च्या फोटोज् ना छान छान कॉमेंट्स करणे हे असले उद्योग तिचे चालायचे. 🥴 कॉलेज लाईफ बद्दल फार छान छान ऐकुन होती ती त्यामुळे कॉलेज मध्ये तरी असं कुणी भेटेल जे तिच्याकडे तिला हवं तस लक्ष देईल असं तिला फार वाटत होतं पण इथे ही निराशाच झाली ह्याला कारणीभूत तिचा अटेंशन सिकिंग हा स्वभाव. 💁🏻‍♀️ सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती उगाच काहीही करायची पण त्याचे परिणाम उलटे होत होते तिच्या ह्या अशा माकड चाळे करण्यामुळे तिला आधी लोक हसत आणि नंतर नंतर दुर्लक्षित करू लागले. "अरे तिच्याकडे लक्ष नको देऊ, वेडी आहे ती, तीच हे नेहमीच आहे, एक नंबरची अटेंशन सिकर आहे ती" हे असं तिच्या बद्दल बोललं जाऊ लागलं. मित्र मैत्रिणी होते पण तिला हवं तसं लक्ष देणारं कुणीच नव्हतं. पण तिने तिचे प्रयत्न सोडले नाहीत.
एकदा तर मॅडम ने कहरच केला कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे ला एक मुलगा मस्त छोट्या छोट्या लाल लाल गुलाबांचा मोठ्ठा बुके घेऊन आला. 💐 तो गेट मधून आत येताना पाहून अनघा मुद्दाम लपून बसली, त्याने फोन केल्यावर इथेच आहे इथेच आहे असं म्हणून संपूर्ण कोलेजभर त्याला फिरवलं. साहजिकच फिरताना त्याने अनघा कुठे भेटेल असं सगळ्यांना विचारलं. अनघा साठी एवढा सुंदर आणि मोठ्ठा बुके कुणी पाठवला असेल ह्या विषयी सर्वांनाच उत्सुकता लागली. 🧐😲 आणि तिला हे विचारण्यासाठी सगळे त्या बुके वाल्या मुलाच्या मागे तिला शोधत फिरत होते. उभ्या आयुष्यात पहिल्यांदा अनघा ला हवं तस अटेंशन मिळत होत. खूप खुश आणि एक्सायटेड होती ती, 😍🤩🥰 पण हाय रे किस्मत इथे ही पचका तिची वाट पाहत होता. फुल्ल शायनिंग मारत, भाव खात मॅडम त्या पोऱ्या समोर आल्या आणि चेहऱ्यावर मिस वर्ल्ड झालेल्या मुली जशा भाव आणतात तसे गालावर हात ठेवून, डोळे मोठे करून अगदी जोश मध्ये तिने तो बुके स्वीकारला आणि मूर्खा सारखं "माझ्यासाठी? कुणी पाठवला?" असं त्याला विचारलं ह्यावर त्याने अगदी मोठ्ठ्याने आणि चिडून खरं काय ते सांगितलं, "काय मॅडम तुम्हीच तर मागवला ना? किती डोकं खाल्ल माझं असच हवं आणि तसचं हवं म्हणून आणि मी इथे बुके घेऊन आलो तर तुमचा पत्ताच नाही... सगळं कॉलेज फिरलो मी, हात दुखू लागला माझा एवढा जड बुके घेऊन... पुढच्या वेळी स्टॉल वर येऊन बुके घेऊन जा नाहीतर रिसिव्ह करायला गेट वर थांबत जा... आणि आता हे माझं बिल द्या" "अरे पण बुके तर ७०० रुपयांचा आहे अस म्हणालास तू मग आता हे १०० एक्स्ट्रा कसले?"-- अनघा. 🤷🏻‍♀️ "हे बघा मॅडम बुके ७०० रुपयांचा च आहे पण तुम्ही जे मला एवढं फिरवलं ना त्याचा हा एक्स्ट्र चार्ज आहे हा, एकतर दुकानात कुणी नाहीये एखाद दुसरं गिऱ्हाईक नक्की येऊन गेलं असेल एवढ्या वेळात त्यामुळे हे वरचे पैसे ही तुम्हाला द्यावेच लागणार." आता भांडून काही उपयोग नाही हे एव्हाना अनघाच्या लक्षात आलच होत शिवाय सगळ्यांचं हसू कानावर येत होत आणि झाल्या प्रकाराची लाज ही वाटतं होती त्यामुळे कधी एकदा तिथून पळ काढते असं तिला झालं होत... तिने त्या बुकेवाल्याचे पैसे दिले आणि धूम ठोकली. करायला गेली काय आणि होऊन बसल काय 🤦🏻‍♀️🤷🏻‍♀️ पैसे तर गेलेच आणि हवं ते ही मिळालं नाही उलट होती नव्हती तेवढी सुद्धा इमेज खराब झाली.
झाल्या प्रकाराने अनघा काही दिवस फार डिस्टर्ब होती पण तरीही मूर्खपणा कमी झाला नव्हता 😏😒 उगाच रडकी आणि दुःखी चेहरे करून सेल्फी काढून त्याखाली feeling sad, feeling lonely हे असं काही लिहून ती सोशल मीडिया वर अपलोड करत होती आणि स्वतः च हस करून घेत होती. 🙄
वेळ हे सगळ्या वरच औषध असतं असं म्हणतात. काही दिवसांनी अनघा आणि बाकी सगळे ही तो बुके चा किस्सा विसरले आणि पूर्ववत अनघा शी बोलू लागले. परीक्षा झाल्या, बाईसाहेब पास झाल बास झालं एवढे मार्कस मिळवून कॉलेज बाहेर पडल्या. काही दिवसांनी छोट्याशा कंपनीत नोकरी मिळाली आणि नवीन आयुष्याला सुरुवात झाली.
कंपनी मध्येही अनघाच्या अटेंशन सिकींग स्वभावामुळे थोड्याच दिवसात सगळ्यांना समजलं की अनघा काय मुलगी आहे ते त्यामुळे इथे ही सगळ्यांनी तिला इग्नोर करायला सुरुवात केली. 🙁
पुढे काय झाले? अनघा ला हवं तस अटेंशन देणारं कुणी मिळालं का? हे जाणून घेऊया पुढील भागात... 

Comments

  1. waiting for next part ...really awaiting for this

    ReplyDelete
  2. मस्त कथा अवती भोवती ची वाटते आपल्या
    पुढचा पार्ट लवकर लिहा वाट पाहतोय

    ReplyDelete
  3. Khup chhan... Utsukata lagliye pudhil bhagachi

    ReplyDelete
  4. अप्रतिम, खुप छान...

    ReplyDelete
  5. छान....!!!

    ReplyDelete
  6. Chan katha ..lavkr pudcha part taka

    ReplyDelete
  7. खुप छान..����

    ReplyDelete
  8. खुप छान पुढे पुढे के हौएल ही जीज्ञासा शब्दा वर पकड़ चांगली आहेत
    पुढील भागा ची प्रतीक्षा

    ReplyDelete

Post a Comment