आई कुठे काय करते 🙃
आई कुठे काय करते 🙃
✍️सखी थरवळ
खालील पोस्ट ज्या प्रोमो वर लिहिली आहे त्याचा व्हिडिओ खाली पोस्ट करीत आहे 👇 तो आधी पहा म्हणजे पोस्ट समजेल
अग्निहोत्र २ पाहत असताना ह्या सिरीयल चे प्रोमो फार त्रास देतात बुवा 🙄😒😕 हो हो त्रास च किती ते रडणं, स्वतःला कमी लेखण, आत रडू आणि ओठावर हसू असलेले भाव घेऊन बोलणं... काही सेकंद चालणारे ते प्रोमो पाहून डोकं उठलं होत 😰 आजकाल एवढं पण कुणी वाईट वागत नाही, पण ही सिरीयल आहे आणि ज्यात अतिशयोक्ती होणार नाही ती सिरीयल कशी म्हणावी नाही का? जेव्हा तुम्ही हाऊस वाइफ होण स्वीकारता तेव्हा घरातील काम करणं ओघाने आलंच आणि आपल्या घरात आपण स्वतःला मालकीण म्हणूनच बघायचं असतं मोलकरीण नाही तूच जर स्वतःला मोलकरीण म्हणत असशील तर दुसऱ्यांनी म्हंटल्यावर कशाला रडतेस? 🙄
बदाम भिजवताना हिने स्वतःसाठी ही भिजवले तर कोण नाही म्हणणार आहे का? पण हीलाच नको आणि मग रडायचं 🙄 इस्त्री चुकीची केल्यावर बोलणारच ना अर्थात बोलण्याची ही एक पद्धत हवी पण ती त्या मुलीला तू लहानपणीच लावायला हवी होती आणि आता ती उर्मट पाणे बोलते म्हणून का रडतेस? नवरा नेहमी डबा परत आणतो म्हणजे तुझ्या जेवणात काही कमी असेल ग ते सुधारून बघ 🤷 आजकाल प्रत्येकाला स्वतः ची अशी स्पेस हवी असते, मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या रूम मध्ये जाताना दार वाजवून जाणं ह्याला मॅनर्स म्हणतात लगेच रडायचं काय त्यात? शाळेच्या मीटिंग ला मुलगी तुला घेऊन जात नाही तिला लाज वाटते तुझी मग तिला असं का वाटतं ह्याचा ही विचार कर ना स्वतः मध्ये बदल कर ना जरा...
टाळी एका हाताने वाजत नाही सगळेच कसे चुकीचे असू शकतील बरं? तू कुठे कमी पडते ह्याचा शोध घे, स्वतः मध्ये बदल घडव, काळाच्या सोबत चाल आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः च स्वतः ला कमी लेखू नको बघ सगळं नीट होईल. मी तर म्हणते ज्यांना ही सिरीयल पहायची आहे त्यांनी श्रीदेवीची इंग्लिश विग्लिश हा सिनेमा पाहा ३ तासात हिच सिरीयल काही अंशी पाहायला मिळेल.
बरं ही सिरीयल आईच पाहते आणि रडते आणि ज्यांनी पाहायला हवी ती मुलं आणि नवरे वेब सिरीज आणि न्यूज किंवा स्पोर्ट्स पाहतात मग काय उपयोग सांगा बरं?
मी तर असंही ऐकलंय की आजकाल काही घरातील आया उगाच तोंड पाडून मुलांना आणि नवऱ्याला उठ सुठ आई कुठे काय करते असा टोमणा मारत आहेत 🙄😕😒
Agadi barobar...
ReplyDelete