कार्टून्स आणि भाषा

कार्टून्स आणि भाषा
✍🏻 सखी थरवळ

आजच्या काळात १०० मध्ये एखादच असं मुल असेल ज्याला एकही कार्टून माहीत नाही. लहान मूल आणि कार्टून हे समीकरणच आहे. अहो लहानच कशाला कार्टून म्हटलं की अगदी म्हातारी झालेली पिढी देखील लहान होते. प्रत्येकाचं असं एक फेवरेट कार्टून असतं आणि त्यामागे भरपूर आठवणी...
माझा जन्म ९० च्या दशकातला त्यामुळे मी 90's किड्स मध्ये मोडते तर आमच्या काळी फॉर्म मध्ये असलेलं कार्टून म्हणजे टॉम अँड जेरी.


हे कार्टून तसं पाहिलं तर खूप जुन पण ह्याची क्रेझ अजूनही आहे. ते म्हणतात ना किती आले किती गेले तरी ह्या सम हाच तस आहे ह्याचं. सारा खेळ ह्या दोघांच्या पकडा पकडी चा पण कधीच बोर नाही झालं.



द जंगल बुक मधील मोगली ही तुफान गाजलं अजूनही त्यावर सिनेमे बनवले जातात. कथा तीच माहीत असलेली पण पाहायला मजा येते.
नंतर नंतर डक टेल्स, पोपाय, लुनी टूनस आणि बरेच कार्टून्स आले. तेव्हा फक्त एकच चॅनेल असल्याने जास्त कार्टून्स नव्हते. पण मग केबल नेटवर्क आले आणि त्यात एक चॅनेल आला कार्टून नेटवर्क ज्यावर चोवीस तास कार्टून्स दाखवले जायचे. आता तसे बरेच चॅनल्स आहेत ज्यावर चोवीस तास फक्त कार्टून्स पाहता येतात.


पण हे चॅनल्स एकतर इंग्लिश मध्ये आहेत किंवा हिंदी मध्ये. मला नेहमी वाटतं की कधीच कुठल्या माणसाने हा विचार का नाही केला की रिजनल लँग्वेज मध्ये कार्टून्स चे चॅनेल ही यायला हवे.
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला जसा आकार द्याल तसं ते मूल घडत जातं. जे काही संस्कार, शिकवण दिली जाते ती लहानपणीच. लहान मुलं सगळ्या गोष्टीचं लगेच अनुकरण करतात, त्यांची चौकस बुद्धी ही खूप गाढ असते. आणि म्हणतात ना मुल मुलात रमत तसच ते टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्टून्स मध्ये ही रमत.


काही मुलांना तर जेवताना आणि झोपताना सुद्धा कार्टून्स पाहण्याची सवय आहे त्याशिवाय त्यांना काही करताच येत नाही. पण मग ही मुलं जे पाहतात ते त्यांच्या भाषेत असेल तर...
आजकाल च्या आईवडलांसाठी देखील हे कार्टून्स चे चॅनल्स म्हणजे एक प्रकारे वरदानच ठरले आहेत. मुलांना मोबाईल मध्ये किंवा टीव्ही वर त्यांचं आवडतं कार्टून लावून दिलं की काम झालं... अहो पण संस्कार, संस्कृती ह्याचं काय? आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आई वडिलांना खरंच वेळ आणि आठवण आहे का मुलांना आपली संस्कृती सांगायला? मुलांचं सोडा हो पण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुळात आई वडिलांना च आपली संस्कृती कितपत माहीत आहे हा देखील एक प्रश्न आहे... मग अशा वेळी जर त्यांच्या आवडत्या कार्टून्स ने त्यांना त्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली तर किती छान होईल बरं...


मी नेहमी विचार करते की असं एखादं खास लहान मुलांचं मराठी चॅनेल असावं ज्यावर लहान मुलांची मराठी गाणी, मराठी गोष्टी, मुलांना समजेल अशा भाषेत मराठी सण, दिवस ह्यांची माहिती देणारं आणि असच काहीस असावं हेच इतर भाषांमध्येही असावं त्यांचे सण, त्यांची संस्कृती त्यांना त्यांच्या भाषेत कळावी.
मला सांगा सध्याच्या पिढीला दिवाळी, गणपती, दसरा आणि असेच महत्वाचे सण सोडले तर बाकी कोणते सण माहीत आहेत बरं? पोळा, त्रिपुरारी पौर्णिमा, अक्षय तृतीया, चतुर्थी, अंगारकी, मंगळागौर, चैत्रा गौर, पिठोरी अमावस्या हे असे बरेच सण किंवा महत्वाचे दिवस देखील आपल्या संस्कृतीमध्ये आहेत हे माहीत आहेत का? ते कसे साजरे करावे, का साजरे करावे, त्या दिवशीच महत्त्व ह्या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी जर ह्या कार्टून्स मध्ये दाखवल्या तर किती छान होईल.
सध्या सुरू असलेले कार्टून्स हे मुख्यतः इंग्रजी भाषेत असल्याने आपल्या मुलांना क्रिसमस च वेड लागलं आहे. आपण ही क्रिसमस ट्री आणावा, तो सजवावा, संता, गिफ्ट हे सगळं त्यांना आवडतं आणि हवं असतं. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करू नये असा माझा विचार नाही पण या सगळ्यात आपण आपली संस्कृती विसरतो आहोत आणि हे होता कामा नये एवढंच.


मुख्यतः गावी बरेचसे सण अगदी छान पद्धतीने साजरे केले जातात. काही अंशी शहरात देखील साजरे होतात पण कुठेतरी त्यात थोडीफार जुळवा जुळव किंवा बदल केलेले दिसून येतात आणि ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शहरात साजरी होणारी वट पौर्णिमा. छोटीशी फांदी आणून घरातच तिची पूजा केली जाते मुलं तेच पाहतात आणि असच असतं असा त्यांचा समज होतो.
अस म्हणतात की माणूस जे ऐकतो त्यापेक्षा जे पाहतो ते त्याच्या जास्त चांगलं लक्षात राहत आणि समजत देखील मग हेच सगळं जर मुलांनी कार्टून रुपात पाहिलं तर त्यांना ते जास्त चांगल्या प्रकारे समजेल आणि लक्षात सुद्धा राहील.
बरं हे झालं सण आणि संस्कृती बद्दल आता येते संस्काराकडे. आजच्या काळात खूप कमी ठिकाणी हे चित्र दिसत की संध्याकाळी मुलं देवासमोर रामरक्षा, शुभंकरोती म्हणत आहेत किंवा जेवणापूर्वी वदनी कवळ घेता म्हणत आहेत हे आणि असेच स्तोत्र किंवा प्रार्थना आपण शिकवल्या तर मुलं तेवढ्या आवडीने नाही करणार पण हेच जर त्यांच्या आवडत्या कार्टून कॅरॅक्टर ने केलं तर नक्कीच ते देखील करतील आणि त्यांना ते पाठ देखील होईल. त्याचप्रमाणे दारापुढे रांगोळी का काढावी? तुळशिपुढे दिवा का लावावा हे आणि असेच प्रत्येक जाती धर्माचे संस्कार देखील त्या कार्टून्स ने मुलांना सांगितले तर ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजतील.
आम्ही लहान असताना एक कार्टून आलेलं पॉपाय. हा पॉपाय पालक खायचा आणि पालक खाल्ल्यावर त्याला ताकद यायची.


त्यावेळी सगळ्या आई वर्गासाठी तो देवदूत होता कारण त्याच नाव घेऊन सगळ्याजणी मुलांना पालक भरवू लागल्या आणि मुलं देखील तो आवडीने खाऊ लागली. हे असच दाखवलं तर मुलं सगळं आवडीने खातील. छोटा भीम लाडू खातो म्हणून बरीच मुल लाडू खायला लागले, मोटू समोसा खातो म्हणून मुलं समोसे खाऊ लागली. पण हेच जर प्रत्येक भाषेतील कार्टून आल तर मराठी मुलं शेपू आणि अळू च्या भाजीपासून ते खर्डा आणि भाकरी आणि वरण भात तूप पर्यंत अगदी आवडीने खातील हेच इतर प्रदेशाबाबतीत ही म्हणता येईल. प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती जर त्या कार्टून मध्ये दाखवली तर मुलांचं पिझ्झा बर्गर च वेड नक्कीच कमी होईल.
प्रत्येक भाषेतील कार्टून ने त्या ठिकाणचा इतिहास, संस्कार, तिथली संस्कृती हे सगळं दाखवाव. असं मला वाटतं. आता काहीजण असंही म्हणतील की यूट्यूब वर हे सगळं आहे पण यूट्यूब पाहण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉप द्यावा लागेल आणि मोबाईल आणि लॅपटॉप चे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम आपण सगळे जाणतोच.
त्यातून जर तुमचा स्मार्ट टीव्ही असेल तर तुम्ही टीव्ही वर यूट्यूब पाहू शकता पण कसं आहे ना मुलं त्यांच्या मित्रांचं फार ऐकतात ओ... माझा अमुक एक मित्र हे वाल कार्टून पाहतो मला पण ते पाहायचं आहे, तो सांगत होता त्यात अशी मजा असते वैगेरे वैगेरे... आता ही यूट्यूब वरील कॅरेक्टर्स सगळ्याच मुलांमध्ये फेमस नसतात मग आपल्या मुलांना ते विचित्र वाटतं की आपण हे का वेगळं पाहतोय जे सगळे पाहतात तेच आपण पण पाहायला हवं आणि मग त्यांना ते अवडेनास होत.
असंही आजकाल शहरातील असो वा गावातील, महाराष्ट्रातील असो किंवा इतर कुठली सगळे पालक शाळा निवडताना इंग्रजी माध्यमच निवडतात मग मुलांना त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, संस्कार कसे बरं समजणार? त्यातून जर घरात कुणी मोठं माणूस असेल किंवा आई घरात असेल तर एकवेळ काहीतरी आशा आहे पण जर आई बाबा दोघेही नोकरी करणारे आणि घरात कुणीही मोठं माणूस नाही म्हंटल्यावर काय होणार? 😕 🤷 अशा मुलांसाठी खूप उपयोगी ठरतील हे असे रिजनल कार्टून चॅनल्स. प्रत्येक भाषेत रिजनल एन्टरटेन्मेंट, मूवी, म्युझिक, न्यूज, धार्मिक, स्पोर्ट्स, फूड इत्यादी बरेच चॅनल्स आहेत मग कार्टून्स च ही प्रत्येक भाषेत चॅनल असावं असं कधीच कुणालाच का वाटलं नाही बरं? 🤔
आजची पिढी, ही लहान मुलं उद्याच भविष्य असणार आहे. आणि ते भविष्य आपणच घडवणार आहोत. अर्थात प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर योग्य तेच संस्कार करतात, चांगलीच शिकवण देतात पण त्यात अजून एक भर म्हणून हे कार्टून नेटवर्क खारीचा वाटा उचलतील असं मला वाटतं.
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, इथे प्रत्येक ठिकाणची अशी वेगळी संस्कृती आणि संस्कार आहेत आणि तेच पाहण्यासाठी लोक दुरून दुरून येत असतात. आपली ही संस्कृती आणि संस्कारांचा अनमोल ठेवा आपणच जपायला हवा आणि पुढच्या पिढीकडे सोपवायला हवा.
हा लेख वाचल्यावर जर तुम्हाला तो पटला आणि तुमच्या ओळखीत जर कुणी ह्या क्षेत्रात काम करणारे असतील तर त्यांच्यापर्यंत माझी ही पोस्ट नक्की पोचवा... 🙏🏻


Comments

  1. अगदी बरोबर आहे.... ह्याचा विचार मराठी वाहिन्यांनी केलाच पाहिजे....

    ReplyDelete
  2. Eter bhashet cartoons serial available ahet mag marathitach ka nhi.marathi vahinyani yavar vichar karava.

    ReplyDelete
  3. खरं आहे बहुतेक भविष्यात याचा विचार नक्कीच मराठी वाहिन्या करतील...

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर विचार, मांडले आहेत आपण!तेही अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारावर .
    मुलांना त्यांच्या संस्कारक्षम वयात असताना त्यांच्याच आवडीच्या माध्यमातून जर संस्कार दिले गेले तर ते निश्चितच कायमस्वरूपी असतील
    टिव्ही दाखवल्या जाणार्या कार्टून्सविषयी इतका सकारात्मक विचार प्रथमच पहायला मिळाला. एरवी आपल्या पाल्यांना कार्टून कशी आवड आहे हे कौतुक मिश्रित रागाने सांगणार्या आताच बहुधा दिसतात

    सध्यातरी हिंदी व इंग्रजी शिवाय दुसर्या भाषेत कार्टून्स बनवत असतील असे वाटत नाही त्यामुळे कळत नकळत मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार होत आहेत हे सत्य आहे .त्या ऐवजी आपण मांडलेल्या मुद्दया प्रमाणे जर हे कार्टून्स वेगवेगळ्या भारतीय संस्कृती बांधणारे निरनिराळ्या भाषेत बनवले गेले तर मुलांवर निश्चितच कायमस्वरूपी चांगले परिणाम होतील .मुख्य म्हणजे त्यांच्या आवडीच्या माध्यमातून. म्हणजेच आधुनिकतेशी तडजोड न करता .हा मुद्दा अतिशय योग्य आहे.

    आमच्या बालपणी टिव्ही, मोबाईल नव्हते पण त्याकाळी साने गुरुजींची "श्यामची आई, ना धो ताम्हणकरांचे गोट्या, चिंगी .शं.ना नवरे यांची बालगीते यामधे मुले दंग असायची व रामायण महाभारतातील गोष्टी सांगणारे आजी आजोबा असायचे .आजच्या काळात ते शक्य नाही . वाचन तर मोठ्या माणसांना पण आवडेनासा झालेय .त्यामुळेच आपण सुचवलेल्या प्रमाणे जर सध्याच्या प्रचलित पद्धतीने या दृक् श्राव्य माध्य्यमाचा योग्य उपयोग करता आला तर ते अतिशय परिणामकारक ठरेल .
    या क्षेत्रातील मंडळी नी या मुद्द्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.

    अतिशय अभ्यासपूर्ण व विचार करायला लावणारे विचार आहेत हे.

    सुधीर याडकीकर

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर विचार, मांडले आहेत आपण!तेही अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारावर .
    मुलांना त्यांच्या संस्कारक्षम वयात असताना त्यांच्याच आवडीच्या माध्यमातून जर संस्कार दिले गेले तर ते निश्चितच कायमस्वरूपी असतील
    टिव्ही दाखवल्या जाणार्या कार्टून्सविषयी इतका सकारात्मक विचार प्रथमच पहायला मिळाला. एरवी आपल्या पाल्यांना कार्टून कशी आवड आहे हे कौतुक मिश्रित रागाने सांगणार्या आताच बहुधा दिसतात

    सध्यातरी हिंदी व इंग्रजी शिवाय दुसर्या भाषेत कार्टून्स बनवत असतील असे वाटत नाही त्यामुळे कळत नकळत मुलांवर पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार होत आहेत हे सत्य आहे .त्या ऐवजी आपण मांडलेल्या मुद्दया प्रमाणे जर हे कार्टून्स वेगवेगळ्या भारतीय संस्कृती बांधणारे निरनिराळ्या भाषेत बनवले गेले तर मुलांवर निश्चितच कायमस्वरूपी चांगले परिणाम होतील .मुख्य म्हणजे त्यांच्या आवडीच्या माध्यमातून. म्हणजेच आधुनिकतेशी तडजोड न करता .हा मुद्दा अतिशय योग्य आहे.

    आमच्या बालपणी टिव्ही, मोबाईल नव्हते पण त्याकाळी साने गुरुजींची "श्यामची आई, ना धो ताम्हणकरांचे गोट्या, चिंगी .शं.ना नवरे यांची बालगीते यामधे मुले दंग असायची व रामायण महाभारतातील गोष्टी सांगणारे आजी आजोबा असायचे .आजच्या काळात ते शक्य नाही . वाचन तर मोठ्या माणसांना पण आवडेनासा झालेय .त्यामुळेच आपण सुचवलेल्या प्रमाणे जर सध्याच्या प्रचलित पद्धतीने या दृक् श्राव्य माध्य्यमाचा योग्य उपयोग करता आला तर ते अतिशय परिणामकारक ठरेल .
    या क्षेत्रातील मंडळी नी या मुद्द्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.

    अतिशय अभ्यासपूर्ण व विचार करायला लावणारे विचार आहेत हे.

    सुधीर याडकीकर

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून आभार 😇🙏🏻

      Delete
    2. Mast m ajunahi Tom & Jerry baghato. Mula barobar Bhim sudhha

      Delete
  6. Agdi sundar kalpana.. Ase zale tar apli sanskruti japnya sathi aankhi madat ch hoil..!!

    ReplyDelete

Post a Comment